बेळगाव:
विद्यार्थ्यांनी, युवकांनी स्वतःचा उद्योग सुरू करून स्वयंपूर्ण व्हावे आणि यशस्वी उद्योजक बनावे, असे विचार युनियन बँक येळळूर चे मुख्य प्रबंधक अभिजीत सायमोते यांनी व्यक्त केले. नवहिंद क्रीडा केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या बौद्धिक स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते नवहिंद भवन येथे बोलत होते. अध्यक्षस्थानी नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजी सायनेकर होते.
नुकतेच नवहिंद भवन येळ्ळूर येथे या बौद्धिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये भाषण, गायन, बुद्धिबळ आणि रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक आप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. सेक्रेटरी आनंद पाटील यांनी ईशस्तवन केले. शिवप्रतिमेचे पूजन अभिजीत सायमोते यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर नवहिंद को ऑप. क्रेडिट सोसायटीचे चेअरमन प्रकाश अष्टेकर , न्यू नवहिंद मल्टीपर्पज चे चेअरमन नारायण जाधव , प्रियदर्शिनी नवहिंद महिला सोसायटीच्या चेअरपर्सन माधुरी पाटील, नवहिंद महिला प्रबोधन संघाच्या अध्यक्षा नीता जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे:-
भाषण प्राथमिक गट- प्रथम क्रमांक भूमी भातकांडे , द्वितीय पूर्वी घाडी , तृतीया हर्ष पाटील.
माध्यमिक गट: प्रथम क्रमांक विद्या चव्हाण , द्वितीय क्रमांक वैजनाथ पाटील , तृतीय क्रमांक लक्ष्मी पाटील.
गायन प्राथमिक गट- प्रथम ग्रंथा गुरव, द्वितीय पद्मश्री सुतार , तृतीय पूजा सायनेकर.
माध्यमिक गट-प्रथम राधिका कंग्रळकर , द्वितीय प्रणिती संभाजी, तृतीय शिवानी पाटील.
बुद्धिबळ प्राथमिक गट- प्रथम रितेश मुचंडीकर , द्वितीय अनिकेत हलगेकर.
माध्यमिक गट- प्रथम सृजन कांबळे , द्वितीय अमृत मोटणकर.
रांगोळी पहिली ते चौथी-प्रथम आयुशी नायकोजी , द्वितीय स्वरा काटकर , तृतीय आदिती लोहार.
रांगोळी पाचवी ते सातवी गट- प्रथम पूजा देसाई , द्वितीय राजनंदिनी जाधव , तृतीय वैष्णवी सांबरेकर , चौथा सृष्टी पत्तार , पाचवा श्रद्धा कोकितकर. रांगोळी माध्यमिक गट- प्रथम मेघना घाडी , द्वितीय साक्षी किल्लेकर , तृतीय श्रेया घोळसे , चौथा नंदिनी साळुंखे , पाचवा प्रज्योती पाटील.
या स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. स्पर्धेतील सर्व विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी नवहिंद क्रीडा केंद्राचे कार्यकर्ते , नवहिंद प्रबोधनी संघाच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या. सूत्रसंचालन अनिल हुंदरे सर यांनी केले तर आभार हणमंत पाटील यांनी मानले.