बस मधील गर्दीमुळे विद्यार्थिनी बेशुद्ध झाल्याची घटना बेळगाव मध्ये घडली आहे. शक्ती योजनेअंतर्गत राज्य सरकारने महिलांना मोफत प्रवासाची सुविधा दिल्याने परिवहनच्या बसेसना प्रचंड गर्दी होत आहे त्यामुळे वादावाद व शाब्दिक चकमकीचे प्रकार घडत आहेत.मात्र गर्दीमुळे एक विद्यार्थ्यांनी बेशुद्ध पडण्याची घटना शहरांमध्ये घडली आहे.
बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकावरून परिवहन महामंडळाची बस उचगाव कडे निघाली होती राणी कित्तूर चन्नम्मा सर्कलला येईपर्यंत ही बस महिलांनी भरली. बसची क्षमता 37 प्रवाशांची आहे पण बस मध्ये जवळपास 120 प्रवासी होते या गर्दीत घुसमटल्याने एक विद्यार्थिनी बेशुद्ध होऊन बसमध्येच कोसळली ही बाब लक्षात येताच वाहकाने बस चालकाला बस थांबविण्यास सांगितले त्यानंतर विद्यार्थिनीला खाली उतरून प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर तिला बरे वाटू लागल्यावर बस पुन्हा उचगावच्या दिशेने मार्गस्थ झाली.