प्रतिनिधी / बेळगाव :उंच डोंगरावरून कोसळणाऱ्या जलधारा अंगावर झेलण्याची मजा काही औरच असते.त्यामुळे घाटमाथ्यातुन उंच डोंगरावरून खळखळून वाहणाऱ्या धबधब्याकडे जाण्यासाठी पर्यटकांची पावले आपसूकच वळतात . कर्नाटक राज्याच्या बेळगाव जिल्हाच्या आसपासच्या परिसरात अनेक निसर्गरम्य पर्यटन स्थळे आहेत.यातील एक म्हणजे गोवा राज्यातील सत्तरी तालुक्याच्या नैसर्गिक अधिवासात असलेला आणि बारमाही वाहणारा साट्रे धबधबा.बारमाही वाहणारा साट्रे धबधबा बनलाय युवकांचे आकर्षण साट्रे गावातील “शिल्पीच्या अडीचो ओझर” या धबधब्याच्या रूपाने वेगळ्याच प्रकारचे आकर्षण निर्माण झालेले आहे. गेल्या वर्ष भरापासून याठिकाणी प्रचंड प्रमाणात पर्यटक दिसून येत आहेत . विशेष म्हणजे शनिवारी आणि रविवारी सत्तरी गावात वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.थोड्या दिवसातच पावसाळ्याला सुरुवात होणार असल्याने याठिकाणी पर्यटकांची गर्दी होण्याची चिन्हे दिसत आहेत .जाभ्या दगडावरून कोसळणारे पाणी पाहिल्यावर मिळतो वेगळाच आनंद बेळगाव पासून अवघ्या 111.7 किलोमीटरवर हा साट्रे धबधबा आहे.वाळपई शहरापासून जवळपास 18 किलोमीटर नगरगाव पंचायत क्षेत्रात येणारा साट्रे गावाचा धबधबा अचानक पणे नावारूपाला आला आहे.मात्र या धबधब्याकडे जाण्यासाठी नऊ ते दहा किलोमीटर चा खडतर प्रवास करावा लागतो . एका युवकाने या ठिकाणी जाऊन सोशल मीडियावर या धबधब्याचे फोटो अपलोड करताच सर्वजण या धबधब्याकडे जाण्यासाठी उत्साही दिसून येत आहेत.बेळगाव चोर्ला, वाळपई, सत्तरी तालुक्यातुन साट्रे धबधब्याकडे जाता येते. यावेळी जंगलातून वाट काढताना अनेक अडचणी देखील येतात . कारण इथून ट्रेकिंग करताना जंगलातून सरपटणाऱ्या प्राण्यांचा सामना करावा लागतो. तसेच जंगलातून जाताना पक्षांचा किलबिलाटही ऐकू येतो. जंगलातील वाट चुकू नये म्हणून वनविभागाच्यावतीने प्रत्येक ग्रुपला एक गाईड करणारा व्यक्ती देण्यात आलेला आहे.जंगलातून वाट काढताना येतात अनेक अडचणी मात्र या गाईडला शुल्क दिल्यावरच हा गाईड तुम्हाला ठिकाणी जाण्यास मार्गदर्शन करतो. जंगलातील नऊ ते दहा किलोमीटरचे अंतर कापण्यास दोन तासांचा कालावधी लागतो. मात्र माघारी परतण्यास तीन तासांचा अवधी लागतो कारण जंगलातुन परत येताना चढ असल्याने मोठया अडचणींचा सामना करावा लागतो.जंगलातुन 10 किमी पर्यंत काढावी लागते पायवाट या जंगलातून परतल्यावर समोर दिसणारे नयनरम्य दृश्य पाहून सर्व थकवा दूर होतो. घनदाट जंगल व डोंगराच्या कपारीत वाहणारा हा बारमाही धबधबा त्याचे रूप अत्यंत मोहक व मनाला भुरळ घालणारे आहे.उंच जांभ्या दगडावरून कोसळणारे पाणी पाहिल्यावर मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. धबधब्याचे पाणी ज्या ठिकाणी कोसळते त्या ठिकाणी ही जांभा दगड असल्यामुळे या धबधब्याचे पाणी स्वच्छ निळ्या रंगाचे आहे. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या साट्रे धबधब्याचे अर्थात (हिडन वॉटर फॉल्सचे) नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी युवक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी करत आहेत.निसर्गसंपन्न पर्यटन स्थळाचा पर्यटक घेताहेत आनंद कशी वाटली या अचानकपणे नावारूपाला आलेल्या साट्रे धबधब्याची माहिती हे कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्ही या पर्यटनस्थळाला भेट दिला असाल तर आम्हाला कमेंट करून सांगा.
D Media 24 > Local News > *#streamwaterfall ,निसर्गप्रेमींना लाभलीय आगळी पर्वणी*