बेळगाव: मामलेदार यांच्या मृत्यूप्रकरणी रिक्षा चालकांना बदनाम केल्याचा प्रयत्न चालू आहे. मामलेदार प्रकरणी परीक्षा चालक नसून टॅक्सी ड्रायव्हर आहे. त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करत बेळगाव ऑटो रिक्षा असोसिएशनच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
शनिवारी गोवाचे माजी आमदार मामलेदार यांचा चालकाच्या हाणामारीत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पण त्या घटनेत असणारा तो ऑटो रिक्षा चालक नसून टॅक्सी चालक आहे. टॅक्सी चालक असा उल्लेख करावा अशी मागणी रिक्षा ड्रायव्हर असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आले.
रिक्षा चालक असा उल्लेख केल्यामुळे शहरातील सर्व रिक्षा चालकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. ग्राहक रिक्षामध्ये बसण्यास नकार देत आहेत.यामुळे रिक्षा चालकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याचे ऑटो रिक्षा चालक असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले.