चन्नेवाडी ता.खानापूर येथील ग्रामस्थांनी क.नंदगड ग्रामपंचायतीचे विकासाधिकारी श्री.भीमाशंकर यांचेकडे अध्यक्ष,ग्रामविकासाधिकारी यांच्या नावे दोन मागण्यांची दोन निवेदने सादर केली, पहिल्या निवेदनात गेली काही वर्षे बंद असलेली प्राथमिक शाळा गावकऱ्यांच्या प्रयत्नातून १ जून पासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे, सद्यस्थितीत शाळा व अंगणवाडी एकाच खोलीत भरविली जात आहे, शेजारीच असलेली शाळेची पहिली इमारत धोकादायक बनली असून अर्धवट पडलेल्या अवस्थेत आहे,
त्यामुळे शाळेच्या परिसरात खेळणाऱ्या शाळेच्या व अंगणवाडीच्या विद्यार्थ्यानसाठी हे जोखमीचे असून ग्रामपंचायतीने ही इमारत जमीनदोस्त करावी, व त्याचे पुननिर्माण करण्यात यावे असे म्हटले आहे. तर दुसऱ्या निवेदनात गावातील सार्वजनिक ठिकाणी ज्या मोकळ्या जागा आहेत त्या सर्व जागांचे ग्रामपंचायती कडून सर्वेक्षण करण्यात यावे, व मोजमाप करून त्याची नोंद उताऱ्यावर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या दोन्ही निवेदनावर पालकवर्ग व गावकऱ्यांच्या सह्या आहेत. यावेळी विठ्ठल पाटील, प्रकाश पाटील,दिलीप पाटील,मुरलीधर पाटील,धनंजय पाटील,भरमाजी पाटील,सुधाकर पाटील,शंकर पाटील,दत्ताराम पाटील,लक्ष्मण पाटील,उदय पाटील,ईश्वर पाटील,प्रेमानंद पाटील आदी उपस्थित होते.