बेळगाव मध्ये टोस्ट मास्टर क्लबची सुरुवात
बेळगाव मध्ये केएलएस आयएमइआर टोस्ट मास्टर क्लबने आपली नवी संस्था सुरू केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना व्यवसायिकांना गृहिणींना मदत करणार असल्याची माहिती झालेल्या पत्रकार परिषदेत टोस्ट मास्टर्स इंटरनॅशनल संस्थेने दिली.
टोस्ट मास्टर इंटरनॅशनल च्या अनेक संस्था आहेत जवळपास 140 देशांमध्ये एक लाख 40 हजार क्लब आहेत . या मध्ये सुमारे तीन लाख लोक टोस्ट मास्टर्सचे सदस्य आहेत.
तसेच फक्त बेंगलोर मध्ये 200 क्लब असून हुबळी मध्ये तीन क्लब आहेत तर आता बेळगाव मध्ये सुद्धा टोस्ट मास्टर्स क्लब ने ही संस्था सुरू केली असून नागरिकांमध्ये या क्लब बद्दल जागरूकता निर्माण करणे हे संस्थेचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
तिला चार वर्षांमध्ये केल्यास आय एम इ आर कॉलेजमधील टोस्ट मास्टर्स क्लब ने विद्यार्थ्यांना त्यांच्या नोकरीच्या मुलाखतीत उत्तीर्ण होण्यास मदत केली आहे त्याचबरोबर व्यवसायिकांना चांगले बनण्यास आणि यशस्वी होण्यास मदत केली आहे.
बेळगावच्या व्यवसायिकांना सुद्धा टोस्ट मास्टर इंटरनॅशनल ही संस्था मदत करणारा असून त्यामधील संवाद कौशल्य विकासित करण्याचा हा हेतू या क्लबचा असल्याची माहिती यावेळी पत्रकार परिषदेत क्लबच्या सदस्यांनी दिली.