बालशिक्षण व विद्या विकास शिबीराला प्रारंभ.
बेळगांव ता 25. अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या माधव सभागृहात विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थेच्या मान्यतेने, विद्याभारती कर्नाटक व बेळगाव जिल्हा विद्याभारती आयोजित बालशिक्षण व विद्या विकास शिबिराला प्रारंभ झाला.
शिबिराच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून जनकल्याण ट्रस्टचे अध्यक्ष अरविंदराव देशपांडे, विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, बेळगांव शहर गटशिक्षण कार्यालयाचे समन्वयक अधिकारी आय, डी, हिरेमठ, विद्याभारती राज्य सचिव वसंत माधव, क्षेत्रीय शिशुवाटिका सहप्रमुख ताराका,संघटन कार्यदर्शी उमेशकुमार जी,प्रांतवेदगणित प्रमुख अमरनाथ,रामकृष्ण ,संगीत प्रमुख सुजाता देवसुर ,रेणुकाजी तसेच जनकल्याण ट्रस्टचे ट्रस्टी कृष्णा भट, राघवेंद्र कागवाड ,अशोक शिंत्रे, रामनाथ नाईक, प्रसाद
कुलकर्णी, संत मीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी उपस्थित होते.
प्रारंभी पाहुण्यांचे हस्ते विविध देवतांचे फोटो पूजन व दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी अरविंदराव देशपांडे, आय डी हिरेमठ यांनी सध्याच्या शिक्षण प्रणालीबद्दल माहिती दिली.
या दहा दिवसाच्या शिशु शिक्षण व विद्या विकास शिबिरात राज्यभरातून आलेल्या 235 शिक्षकांना रंगमंच, कलाशालेय प्रदर्शनीय, कार्यशाळा, विज्ञान प्रयोगशाळा, चित्र पुस्तकालय, प्राणी संग्रहालय, वस्तू संग्रहालय, जलतरण, गार्डन, खेळाचे मैदान,घराची प्रतिकूती प्रदर्शनीद्वारे शिक्षण देण्यात येणार आहे तसेच दिवसभराच्या कार्यशाळेत शारीरिक, मानसिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक, संगीत, बौद्धिक या विषयावरती विविध तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता पेटकर तर प्रीती कोलकार यांनी आभार मानले.