श्री विश्वकर्मा सेवा संघचा वधू वर सूचक मेळावा
नवीन वर्षाची सुरुवात आणि मकर संक्रांति या सणाचे औचित्य साधन विश्वकर्मा सेवा संघाच्या वतीने श्री विश्वकर्मा सेवा संघ वधू वर सूचक मेळाव्याचा उद्घाटन सोहळा पार पडला त्याचबरोबर महिला मंडळाची स्थापना देखील करण्यात आली.
यावेळी या कार्यक्रमांना प्रमुख पाहुण्या म्हणून एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीना बेनके आणि वकील सुषमा पाटील उपस्थित होत्या. यामुळे त्यांचे स्वागत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले.
यावेळी पाहुण्यांचा सत्कार आणि नव्याने स्थापना झालेल्या महिला मंडळाचा पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर विश्वकर्मा सेवा संघाचे अध्यक्ष रमेश लोहार यांनी संघाची उद्दिष्टे स्पष्ट केली.
तसेच आज तागाहियात श्री विश्वकर्मा सेवा संघाने कोण कोणती समाज उपयोगी कार्य हाती घेऊन ती पूर्ण केली आहे याची माहिती महिला मंडळाला दिली.तसेच त्यांनीही अशाच प्रकारे कार्य करून समाजपयोगी काम करावे असा कानमंत्र दिला.
त्यानंतर प्रमुख पाहुण्या या नात्याने बोलताना मीना अनिल बेनके या म्हणाल्या की महिला मंडळाची स्थापना केल्याने महिलांच्या हाताला काम मिळणार आहे तसेच स्वतःचे कर्तृत्व निर्माण करण्याकरिता त्यांना एक संधी मिळाली आहे त्यामुळे प्रत्येक महिलेने मंडळात काहीतरी करून दाखवावे आणि समाजापुढे आदर्श निर्माण करावा असे सांगितले
त्यानंतर त्यांनी वधुवर सुचक मेळाव्याचे उद्घाटन केल्यामुळे मंडळाचे कौतुक केले. यावेळी त्या म्हणाल्या की आपल्या समाजात अनेक मुलं मुली आहेत मात्र योग्य जोडीदार शोधणे हे सध्या अवघड बनले आहे मात्र श्री विश्वकर्मा सेवा संघाच्या वतीने समाजातील मुला मुली शोधणे सोपे जाणार आहे
तसेच या वधू वर सूचक मेळाव्यातून एखाद्याचा विवाह ठरल्यास जोडीदार एकत्र येणार आहेत आणि त्यांचा संसार फुलणार आहे असे सांगितले. यावेळी या कार्यक्रमाला श्री विश्वकर्मा सेवा संघाचे पदाधिकारी सदस्यांनी कार्यकर्ते उपस्थित होते