समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांच्याकडून खेळाचे प्रशिक्षण
समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांनी हिंदवाडी येथील आदर्श विद्यामंदिर मधील विद्यार्थ्यांसाठी कब्बडी चे प्रशिक्षण आयोजित केले आहे. आठवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांसाठी सदर खेळाचे प्रशिक्षण माधुरी जाधव पाटील यांनी देत आहेत. मुलांनी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सुदृढ राहावे, तसेच क्रीडाप्रकारात प्राविण्य मिळवावे, या दृष्टिकोनातून त्यांनी हे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या कार्यात किणये येथील वीर पाटील यांनीही हातभार लावत विद्यार्थ्यांना आवश्यक क्रीडा साहित्य सामुग्री उपलब्ध करून दिली.
विद्यार्थ्यांनी अभ्यासासह खेळ देखील खेळावेत,विविध क्रीडाप्रकार आत्मसात करावेत या उद्देशाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. माधुरी जाधव पाटील या आदर्श विद्यामंदिराच्या माजी विद्यार्थिनी असून आपल्या शाळेतील नव्या पिढीच्या विद्यार्थ्यांनी क्रीडाप्रकारात प्राविण्य मिळवून विविध ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेत यश संपादन करून शाळेचे नाव उंचावावे, या दृष्टिकोनातून त्यांनी हा उपक्रम राबविला आहे. https://fb.watch/izzSGyd0pC/
त्यांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाचे शालेय मुख्याध्यापक के पी शिवराय शिक्षक सुजाता खराडे आणि मनोहर गोरल व विद्यार्थ्यांनी कौतुक केले.