एंजल फाउंडेशने आयोजित केलेल्या दुचाकी रॅलीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कोणताही सण नसताना महिलांना पारंपारिक वेशभूषेत तयार होण्याची संधी एंजल फाउंडेशने उपलब्ध करून दिली. एंजल फाउंडेशनच्या वतीने महिलांकरिता दुचाकी रॅली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जवळपास 200 हून अधिक महिलांनी पारंपारिक वेशभूषा करून या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.
यावेळी स्पर्धेतील सर्वच महिलांनी फेटे परिधान केले होते तसेच नऊवारी साडी नेसून नाकात नथ हातात बांगड्या गळ्यात दागिने घालून तसेच कपाळावर चंद्रकोर लावून या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या.
यावेळी या बाईक रॅलीत गौरी लटकन यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तर दुसरा क्रमांक आलिशा पाटील आणि तिसरा क्रमांक गीता डायजोडे यांनी पटकाविला तसेच अन्य विजेत्यांना एंजल फाउंडेशन च्या वतीने प्रशस्तीपत्र मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले
यावेळी महिला विद्यालय मराठी मिडीयम हायस्कूलच्या सभागृहात या आयोजित केलेल्या महिलांकरिता दुचाकी बाईक रॅलीच्या बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यावेळी बक्षीस वितरण समारंभात व्यासपीठावर एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके अध्यक्षा मोलिशका पवार प्रमुख पाहुण्या रुपांजली भोसले उपस्थित होत्या.
यावेळी सर्व महिला विद्यालयाच्या पटांगणावर एकत्रित जमल्यानंतर चन्नमा सर्कल मार्गे संभाजी चौक पर्यंत बाईक रॅली काढण्यात आली. त्यानंतर पुन्हा महिला विद्यालयाच्या पटांगणावर येऊन बक्षीस वितरण कार्यक्रमाला सुरुवात झाली.
प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात इशस्तवन आणि स्वागत गीताने झाली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना रूपांजली भोसले यांनी रणरागिनींनी अशाच प्रकारे आपली संस्कृती टिकून राहावी आणि हिंदू धर्म टिकून राहण्याकरिता मोलाचे मार्गदर्शन यावेळी बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी केले.
त्यानंतर विजेत्या स्पर्धकांना बक्षीसे देण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा नाडगौडा यांनी केले.