आर पी डी काॅलेजच्या वाणिज्य विभागाच्या वतीने आयोजित स्पेक्ट्रा या कार्यक्रमाची सांगता
स्पेक्ट्रा या कार्यक्रमाची सांगता आणि पारितोषिक वितरण सोहळा आज आयोजित करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे प्रा.अरविंद हलगेकर हे लाभले, स्पर्धकांना मार्गदर्शन आणि शुभेच्छा देतेवेळी त्यांनी जीवनात यश हे प्रयत्नाच्या पराकाष्ठा आणि जिद्द त्यांच्यातून प्राप्त करता येते असे उद्गार व्यक्त केले तसेच आजच्या युवा पिढीने आपल्या जीवनात जीवन मूल्यांची महता चालवतेवेळी पर्यावरणास प्रथम स्थान द्यावे,पर्यावरणाचे संवर्धन हा ध्येय राखावे असे विचार व्यक्त केले.
प्रा. एस एस शिंदे यांनी आभार व्यक्त केले, या स्पर्धेत बी काॅम तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यी संघाने विजेते पद प्राप्त केलेआणि बी काॅम व्दितीय वर्षाच्या विद्यार्थ्याना द्वितीय पारितोषिक देण्यात आले, बी काॅम तृतीय वर्षाचे संघ प्रमुख प्रा साईशिला जडे ह्या होत्या,विद्यार्थी प्रतिनिधी युवराज बडस हे होते,बी काॅम व्दितीय वर्षाचा संघ प्रमुख प्रा. वीजया जोशी आणि विद्यार्थी प्रतिनिधी दर्शन शेट्टि हे होते.
या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थी वर्गाच्या कलागुणांना उजाळा देणे आणि त्यांच्यामध्ये नवनवीन वैचारीक क्षमताना वाव देणे,भविष्यात आपली कार्य क्षमतेचा उपयोग करता यावा हा आहे.
प्रत्येक संघास प्रमाण पत्र आणि मानचिन्ह देण्यात आले ही स्पर्धा चार दिवस आयोजित करण्यात आली, प्रत्येक संघाने आपली गुणवत्ता दर्शवली, स्पर्धेत प्रत्येक संघाचे उत्तम प्रदर्शन केले.
सूत्रसंचलन प्रा साईशिला जडे यांनी केले, आभार वाणिज्य मंत्री कुमारी नीता मलानी यांनी केले.