*जीएसएस पदवीपूर्व कॉलेजतर्फे संगणक विज्ञान विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यान*
बेळगाव, ता. 1: टिळकवाडी येथील जीएसएस पदवीपूर्व महाविद्यालयात संगणक विभागाच्या वतीने विद्यार्थ्यासाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य एस एन देसाई हे होते. तर व्याख्याते म्हणून आरपीडी पदवीपूर्व कॉलेजचे प्राध्यापक अभिजीत पाटील उपस्थित होते. प्रारंभी संगणक विभाग प्रमुख प्रा. सोनिया चिट्टी यांनी प्रास्ताविकामध्ये विशेष व्याख्यान आयोजनाचा उद्देश स्पष्ट करत व्यासपीठावर उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
व्याख्याते प्रा. अभिजीत पाटील यांनी स्टडी ऑफ मदरबोर्ड या विषयावर विद्यार्थ्यांना विशेष व्याख्यान दिले. यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना मदरबोर्ड चे कार्य कसे चालते ? डेटा ट्रान्सफर, रॅम मधून डेटा सीपीयू मध्ये कसा ट्रान्सफर केला जातो, रॅम मेमरी चे प्रकार कोणते, सिमॉस बॅटरी ऑन मदरबोर्ड चे कार्य कसे चालते, बॅटरीचे प्रकार, मदरबोर्ड मधील पोर्टस चे प्रकार याविषयी विद्यार्थ्यांना कृतीसह सखोल माहिती दिली. सूत्रसंचालन कुमारी मेखला पाटील हिने केले. तर आभार प्रा. दत्तात्रय जोशी यांनी मानले. व्याख्यानाला पदवीपूर्व कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*फोटो वृत्त -टिळकवडी : प्राध्यापक अभिजीत पाटील यांचे स्वागत करताना प्रा. सोनिया चिट्टी*