वाॅर वुन्डेड फाउंडेशन*गौंडवाड गावामध्ये रस्त्याच्या विकास कामाला चालना* या संस्थेतर्फे दि. 18 फेब्रुवारी 2025 रोजी युद्धात अपंगत्व आलेल्या सैनिकांच्या राष्ट्रीय पातळीवरील मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत
वाॅर वुन्डेड फाउंडेशनचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल(निवृत्त ) असित बी. मिस्त्री यांनी दिली. पत्रकार परिषदेला निवृत्त ब्रिगेडीयर सी. संदीप कुमार आणि मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटरचे ब्रिगेडीयर जॉयदीप मुखर्जी उपस्थित होते.
बेळगावात होणाऱ्या या मेळाव्यामध्ये सुमारे १२० दिव्यांग सैनिक सहभागी होणार आहेत. या मेळाव्यात देशातील विविध भागातून युद्धात अपंगत्व आलेले सैनिक सहभागी होणार आहेत. आमच्या फाऊंडेशनचे ‘असक्षमतेकडून सक्षमतेकडे वाटचाल’ हे ध्येय आहे असेही असित मिस्त्री यांनी बोलताना सांगितले.
या अपंग सैनिकांनी फक्त आपले जीवनमान सुधारावयाचे नाही तर देशातील युवा पिढीसाठी आदर्श निर्माण करायचा आहे. फाऊंडेशन तर्फे नोकरी, व्यवसाय यासाठी मदत केली जाते. सुलभपणे फिरण्यासाठी त्यांना वाहन उपलब्ध करून दिले जाते.
कोणाच्याही मदतीशिवाय नैसर्गिक विधी करता यावेत यासाठी या अपंग सैनिकांकरिता त्यांच्या घरात सुधारित शौचालय बांधून दिली जातात. या सैनिकांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी कौशल्य विकास उपक्रम राबविले जातात असे सांगून या पद्धतीने विविध मार्गाने आम्ही युद्धात अपंगत्व आलेल्या सैनिकांच्या हिताच्या दृष्टीने कार्य करत आहोत, असे असित मिस्त्री यांनी स्पष्ट केले.*लव जिहाद या पुस्तकाचे झाले प्रकाशन*