मार्कंडेय साखर कारखान्याची सूत्रे आता शेतकरी बचाव पॅनल कडे आली आहेत. त्यामुळे आता शेतकरी बचाव गट विजयी झाला असून सामान्य गटात चार जागांवर त्यांनी विजय मिळविला आहे.
यामध्ये आर आय पाटील शिवाजी कुटरे सिधा पाटोमरी ज्योतिबा आंबोळकर यांचा समावेश आहे. तर पोतदार सामान्य गटातून विद्यमान अध्यक्ष अविनाश पोद्दार बाबुराव पिंगट बसवंत मायानाचे यांनी तर महिलांमधून वसुधा महाळूची यांनी एसी गटातून केवळ दोन मतांच्या फरकांनी चेतक कांबळे यांनी विजय मिळविला आहे.
त्याचबरोबर एसटी गटातून लक्ष्मण नाईक यांनीही विजय प्राप्त केला असून ओबीसी गटातून विद्यमान उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी भक्कम विजयी मिळवला असल्याने आता मार्कंडीची सूत्रे शेतकरी पॅनल कडे राहिली आहेत.
रविवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी मार्कंडेय साखर कारखान्याकरिता निवडणूक पार पडली हे निवडणुकीचा मतदानाचा निकाल रात्री लागला निकाल जाहीर होताच सर्वांनी एकच जल्लोष केला.
यावेळी मतदानात 15 पैकी दहा जागांवर विजयी मिळवत शेतकरी बचाव गटाने निर्विवाद वर्चस्व मिळवले तर पोतदार गटाला केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले आहे