सामाजिक कार्यकर्ते शिवाजी काकणीकर डॉक्टरेट पदवी बहाल
बेळगावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जलसंरक्षक शिवाजी काकणीकर यांनी केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल त्यांना मानद डॉक्टरेट पदवी देऊन गौरविण्यात येणार आहे. कर्नाटक राज्य ग्रामीण विकास आणि पंचायत राज्य विद्यापीठ गदग या विद्यापीठाच्या उद्या होणाऱ्या तिसऱ्या पदवीदान समारंभ प्रसंगी त्यांना मानद डॉक्टरेट पदवी देऊन गौरविण्यात येणार आहे.
ज्येष्ठ सर्वोदय कार्यकर्ते शिवाजी कागणीकर यांना डॉक्टरेट पदवी मिळाली असल्याने त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. या पदवीमुळे सीमा भागातील एका श्रमजीवी कार्यकर्ताचा गौरव झाला असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
शिवाजी कागणीकर यांनी रोजगार हमी योजनेत राबणाऱ्या कष्टकरी बांधवांना त्यांचा अधिकार मिळावा यासाठी सातत्याने आंदोलन केले होते त्याचबरोबर ग्रामीण भागात पाणी समस्या सोडविण्यासाठी आणि शेतामधील तलावांची निर्मिती तसेच पाणी आडवा आणि जिरवा या योजनेसाठी स्वतः अथक परिश्रम घेतले आहेत.
त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी पाहून तसेच त्यांनी केलेल्या कार्य पाहून त्यांना कर्नाटक राज्य पंचायत विभाग मानद डॉक्टरेट ही पदवी देऊन गौरविणार आहेत.