*तर….. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट*
गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी अवकाळी पाऊस कमी झाल्याने शेतीची मशागत कमी झाली आणी ऐन रोहिणीची धूळपेरणी म्हणजे मोत्याचा तुरा अशी शेतकऱ्यात समज असल्याने जमीनीची चांगली व शेणखत घालून पुन्हा मशागत करुन पेरणी करतात.पण त्याचवेळी मोठे अवकाळी पाऊस झाल्याने अनेकांनी एकदोनदा मशागत करुन सरळ पेरणीच केली पण ती जड जाते.कारण जी जमीनीतील कसर उगवण व्हायच्या आधी पेरल्यास भांगलणीचा खर्च जादा येतो.त्याचा विचार न करता जमीनीत साधारण ओल असतानां अनेकांनी मे व जूनच्या पहिल्या आठवड्यात भातपेरणी केली.पण पेरणी केल्यावर पावसाने हुलकावणी दिली.
त्यामूळे भाताची अर्धवट उगवण तसेच बियाणांत अलीकडे रासायनीक खतं घालून पेरणी होत असल्याने त्यावर ताबडतोब पाऊस झाल्यास उगवण चांगली होते.पण आता पाऊस गेल्याने त्या खतांमूळे बियाणं नष्ट होतात त्याचबरोबर वरच्यावर पेरलेली बियाणं पीष्टमय होऊन नष्ट होतात.त्यासाठी आता प्रत्येक शेतकऱ्यांचे आभाळाकडेच लक्ष असते.
वास्तविक पहाता म्रूग नक्षत्र कधी वाया जातानां दिसत नाही. पण यावर्षी त्याचा पत्ताच नाही. पण येत्या दोन,चार दिवसात जर चांगला पाऊस झाला नाही तर प्रत्येक शेतकऱ्यावर खरिप पेरणीचे दुबार संकट आल्याशिवाय रहाणार नाही.या परिसरात जास्तीतजास्त बासमती,इंद्रयणी अशी किमती बियाणांची पेरणी होते.त्यानंतर इतर अनेक जातीची.त्यामूळे शासनाकडे बासमती,इंद्रयणी बियाणचं नसतात मात्र इतर बियाणं मीळतात.यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी बासमती 60 रु तर इंद्रायणी 50 रु किलो भावाने घेऊन पेरली आहेत. आणी जर दुबार पेरणीच संकट आल्यास शेतकऱ्यांना नक्कीच पुन्हा बियाणं,खतं,पेरणी मजूरी लागल्याने एकरी किमान 10/15 हजार रु खर्च येणार आहे. पीकं येतात तेंव्हा ती विकायला गेल्यास भाव कमी असतो आणी पेरणी करताना मात्र डबल होतो.त्यासाठी जर येत्या दोन/चार दिवसात जर सगळीकडे पाऊस झालानाही तर राज्यातील सर्वच शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येणार आहे.
तेंव्हा नवनिर्वाचित सरकारने शेतकऱ्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन दुबार पेरणी लागल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत करुन दिलासा दिल्यास शेतकरी समाधानी होईल अन्यथा मागच्या शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या भाजपा सरकारपेक्षा आताचे सळकारही तेच अशा भावनां व्यक्त करत दुषण दिल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाहीत.