बीके कंग्राळी येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेमध्ये बॅच २००६ आणि ७ मधील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात
बेळगांव:तब्बल पंधरा वर्षानंतर बीके कंग्राळी येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेमध्ये बॅच २००६ आणि ७ मधील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी वर्गातील सर्व विद्यार्थी या स्नेह मेळाव्याला उपस्थित होते.
प्रारंभी दीप प्रज्वलन करून तसेच गणेश मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर 2006-07 साली विद्यार्थ्यांना शिकविलेल्या गुरुजनांचा शाल व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रम गौंडवाड येथील मोनाका मंगल कार्यालयामध्ये पार पडला.
त्यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांना आपण सध्या कोणत्या पदावर कार्यरत आहोत याची माहिती दिली. त्यानंतर शिक्षकांनी सुद्धा आपले विद्यार्थी हे अजूनही विद्यार्थीच आहेत ते म्हणून त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
विद्यार्थी दशेत त्यांनी कसे राहायला होते त्याचे त्यांनी राहिले मात्र आता ते पुढील जीवनात कशाप्रकारे रहावे आपले जीवन कसे जगावे येणाऱ्या संकटांना कशाप्रकारे सामोरे जावे याबद्दल मार्गदर्शन केले.
त्यानंतर सर्व गुरुजनांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी शिक्षक शिक्षिका व सर्व जमलेल्या विद्यार्थ्यांनी स्नेहभोजनाचा लाभ घेऊन झाल्यानंतर शाळेमध्ये खेळत असलेले सर्व खेळ खेळले.
आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी खेळामध्ये प्रथम आलेल्या विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.