बेळगाव विमानतळासाठी अतिरिक्त जमिनीसाठी जागेची पाहणी
सांबरा विमानतळाच्या विकासासाठी विमानतळ प्राधिकरणाने अतिरिक्त जमिनीसाठी केलेल्या विनंतीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी आणि महिला व बालकल्याण मंत्री यांच्या उपस्थितीत जागेची पाहणी करण्यात आली.
यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर विमानतळाच्या विकासासाठी आम्ही सर्वजण सहकार्य करण्यास कटिबद्ध आहोतअसे सांगितले . तथापि, आम्ही आजूबाजूच्या निवासी भागात कोणताही व्यत्यय कामाप्रसंगी देणार नाही नागरिकांची काळजी घेणे त्यांना होणार त्रास टाळणे हे महत्वाचे आहे असे सांगितले .
शिवाय, आम्ही कोणतीही अतिरिक्त जमीन संपादित करण्यापूर्वी शेतकऱ्यांची संमती घेण्याच्या महत्त्वावर भर दिला आहे, असे मंत्री हेब्बाळकर म्हणाले. या तपासणीदरम्यान, राज्यसभा सदस्य इराणा कडाडी , आमदार आसिफ सेठ, जिल्हाधिकारी नितेश पाटील, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक त्यागराजन, पोलिस आयुक्त सिद्रामप्पा, एसपी भीमाशंकर गुलेद, आयुक्त अशोक दुडगुंटी आणि डीसीपी स्नेहा पी उपस्थित होत्या.