गायक व संगीत शिक्षक विनायक मोरे परिवाराचा
काकडे फौंडेशनच्यावतीने हृद सत्कार समारोह
काकडे फौंडेशनच्यावतीने प्रथितयश गायक व संगीत शिक्षक श्री विनायक मोरे, सौ. अक्षता मोरे, स्वरा व श्रीशा यांचा खास सत्कार करून सन्मानीत करण्यात आले. गुढी पाडव्यानिमित्त काकडे फौंडेशनच्या दहाव्या वर्षपूर्तीप्रीत्यर्थ (2015- 2025) ज्येष्ठ संगीततज्ञ व श्री मोरेंचे गुरु पंडित नंदन हेर्लेकर यांच्या शुभहस्ते शाल, फळकरंडी, भेटवस्तू तसेच श्रीमती गंगुताई गाडगीळ- श्रीमती विजया मधुकर काकडे स्मृत्यर्थ “मोरे परिवार सुरीला परिवार” विशेष सम्मानपत्र देऊन श्री मोरे यांच्या संगीत सेवाकार्याचा सार्थ गौरव करण्यात आला. सत्कारमुर्ती विनायक मोरे यांनी काकडे फौंडेशनचे आभार मानत सत्काराप्रती “स्वरांजली” सुगमसंगीत कार्यक्रमाद्वारे सुंदर मराठी, कन्नड, कोंकणी बहारदार गीते प्रस्तुत करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. त्यांना तबल्यावर संतोष पुरी व हार्मोनियमवर चैत्रा अध्यापक यांनी सुरेख संगीतसाथ दिली. भारत विकास परीषदेचा विशेष सहयोग या कार्यक्रमासाठी लाभला.https://dmedia24.com/distribution-of-bench-at-model-school-in-yelur/
यावेळी बंधू नितीन काकडे, सौ. उज्वला काकडेसह कन्या ॲड. सौ. दीप्ती भट, अभियंता सौ. कीर्ति प्रताप, चि. मानस- तेजस भट, विरेन प्रताप व रुद्र प्रताप तसेच भारत विकास परीषदेचे सर्व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. विशेष अतिथी आणि संगीत विद्वान पं. नंदन हेर्लेकर यांनी मोरे परिवाराचे अभिनंदन करीत काकडे बंधुंचे या स्तुत्य उपक्रमासाठी कौतुक केले. आपल्यावर रा. स्व. संघाचे संस्कार झाले असे सांगत समूहगीताचे महत्व आम्हाला संघातच समजले, असे नंदन हेर्लेकर म्हणाले व विनायक मोरे या आपल्या गुणी शिष्याच्या संगीतकार्याचे भरभरून कौतुक केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि भारतमाता व स्वामी विवेकानंद प्रतिमा पूजन करण्यात आले. किशोर काकडे यांनी संपूर्ण वंदेमातरमने सुरुवात केली. प्रा. अरुणा नाईक यांनी सुरेख सुत्रसंचालन केले व किशोर काकडे यांनी आभार मानले.
काकडे परीवारातील दीप्ती व कीर्ती यांनीही गाणी सादर करीत रंगत आणली. त्यांनी पिता किशोर काकडे यांच्या सेवानिवृत्ती नंतरच्या दहा वर्षातील काकडे फौंडेशनच्या माध्यमातून केलेल्या सेवाकार्याचे अभिनंदन केले. गेली दहा वर्षे काकडे फौंडेशनसारख्या छोट्या संस्थेच्या उपक्रमाना सर्व वृत्तपत्रे व समाजमाध्यमांनी वेळोवेळी प्रसिद्धी देउन उत्साह वाढवल्याबद्दल मिडियाचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. तसेच काकडे फौंडेशनची सदैव मदत करणाऱ्या सर्वश्री सुधीर जोगळेकर, बंधू नितीन काकडे, उदय मराठे, सौ. सुनीता मराठे, सौ. अपुर्वा देशपांडे, सौ. दीप्ती, कीर्ति आणि सौ. उज्वला काकडे यांचे पुष्पगुच्छ देउन कौतुक करण्यात आले. सौ. मंगल हेब्बाळकर यानीही आपले मनोगत व्यक्त करीत काकडे परीवाराला सदिच्छा दिल्या. सर्वाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला. अल्पोपहारानंतर हा छोटेखानी सुंदर कार्यक्रम पार पडला.