जेसीसीआरपीएफ न्यू दिल्ली येथील पोलिस कर्मचारी व सह्याद्री कॉलनी, जैतनमाळ, उद्यमबाग येथील रहिवासी समता कुऱ्याळकर हिने नुकत्याच झालेल्या पॅनकेक व ज्यूदो स्पर्धेत एक रौप्य, एक कांस्यपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
आसाम येथे नुकत्याच झालेल्या नवव्या अखिल भारतीय पोलिस ज्यूदो क्लस्टर स्पर्धेत समता हिने ६० किलो वजनी गटात पॅनकेक क्रीडा प्रकारात रौप्यपदक तर ५२ किलोवजनी गटात ज्यूदोत कांस्यपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.