वीज दरवाढी विरोधात विविध संघटनांच्या वतीने मूक मोर्चा
वीज दरवाढ विरोधात आज विविध संघटनांच्या वतीने मूक मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात वीजदर वाढ संदर्भात सूट देण्यात यावी आणि साधा आकारण्यात आलेली पैसे कमी करावेत अशी मागणी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज च्या वतीने करण्यात आली.
आज बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या नेतृत्वाखाली कित्तूर राणी चन्नमा सर्कल येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी या मोर्चात व्यापारी औद्योगिक आणि अन्य क्षेत्रातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
आणि आपली मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला.
राज्यातील अवास्तव वीज दरवाढीचा प्रतिकूल परिणाम संपूर्ण राजासह औद्योगिक आणि व्यापार क्षेत्रावर झाला आहे. आधीच वाढत्या महागाईला तोंड देत असताना सर्वसामान्य नागरिकांसह उद्योग आणि व्यापार बोजामुळे मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत ही वाढीव वीज दर कमी करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली