सिद्धेश्वर मंदिर जिर्णोद्धार सोहळ्याला प्रारंभ
बेळगाव:
येलूर येथील सिद्धेश्वर गल्लीतील श्री सिद्धेश्वर मंदिराचे नूतनीकरण नुकतेच करण्यात आले आहे. त्यानिमित्त शनिवार दि.14 पासून तीन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 14 रोजी सकाळी गावातून गंगा कलश मिरवणूक काढण्यात आली. तसेच सायंकाळी विविध देवदेवतांचे पूजन करून यज्ञ करण्यात आला.
रविवार दिनांक 15 रोजी सकाळी पाच वाजता महासंकल्प यज्ञ आणि नवग्रह पूजन करण्यात येणार आहे. सायंकाळी पाच वाजता गणहोम , वास्तु होम आणि शांती होम संपन्न होणार आहे. सोमवार दि.16 रोजी सकाळी पाच वाजता विविध देवदेवतांचे प्राणप्रतिष्ठापना आणि कळसारोहण होणार असून दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा , असे आवाहन श्री सिद्धेश्वर मंदिर जीर्णोद्धार मंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.