शुभमन गिल , ऋषभ पंत यांनी डाव सावरला
तिसरी कसोटी सत्र पहिले
मुंबई:तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या शुभमन आणि ऋषभ पंत ने भारतीय डाव सावरला. त्यांनी पाचव्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी केली.
शुक्रवारी न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. 235 धावांवर त्यांचा डाव गुंडाळण्यात आला. खेळाच्या दुसऱ्या दिवशी भारताने चांगली सुरुवात केली. ऋषभ पंत आणि शुभमन या दोघांनी आपापली अर्धशतके पूर्ण केली.
4 बाद 84 वरून त्यांनी धावसंख्या पाच बाद 180 पर्यंत नेली. त्यामुळे भारताचा डाव सावरला. शनिवारी पहिल्या सत्रातील खेळ थांबला तेव्हा ऋषभ पंत 60 धावांवर बाद झाला होता तर गील 70 धावांवर नाबाद खेळत होता.
विराट कोहली चा विशेष पराक्रम
विराट कोहली या कसोटीतील पहिल्या डावांमध्ये फक्त चार धावांवर बाद झाला असलातरी त्याच्या नावे एक विशेष विक्रम झाला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 डाव पूर्ण खेळणारा तो खेळाडू ठरला आहे. 600 आंतरराष्ट्रीय डाव खेळणारा तो पहिला सक्रिय क्रिकेटपटू ठरला तर तिसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी अशी कामगिरी सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांनी भारतातर्फे केली आहे. अशी कामगिरी करणारा विराट कोहली हा जगामधील एकूण आठवा क्रिकेटपटू ठरला आहे.