*दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ, ज्योती करिअर अकॅडमी, ज्योती व बी.के. कॉलेजतर्फे आय ए एस परीक्षेत उत्तीर्ण झालेली श्रुती येरगट्टी, नाझिया पटवेगार, प्रतीक्षा पाटील यांचा सन्मान सोहळा , मार्गदर्शन शिबिर आणि व्याख्यान होणार*
बेळगाव , तारीख ( 31 मे 2023 ) : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगांव आणि ज्योती करियर अकॅडमी बेळगाव, भाऊराव काकतकर महाविद्यालय बेळगाव, ज्योती पदवी पूर्व महाविद्यालय बेळगाव, माजी विद्यार्थी संघटना बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयएएस 2023-24 परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींचा सत्कार-सन्मान सोहळा आणि मार्गदर्शन शिबिर, आणि व्याख्यानाचे आयोजन असा संयुक्त कार्यक्रम सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजता भाऊराव काकतकर महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळचे उपाध्यक्ष आणि साप्ताहिक राष्ट्रवीरचे ज्येष्ठ संपादक, महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व मार्गदर्शक सल्लागार *ॲड. राजाभाऊ पाटील* उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी आयएएस परीक्षेत उत्तीर्ण झालेले बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील *श्रृती यरगट्टी ( AIR – 362 ALL INDIA RANK )* , यासोबत डेप्युटी डायरेक्टर स्टेट अकाउंटंट अँड ऑडिट डिपार्टमेंट कर्नाटक गव्हर्नमेंट प्रोबेशनरी श्रीमती *नाझिया पटवेगार* आणि युनियन बँक ऑफ इंडिया अँड स्टेट बँक ऑफ इंडिया या परीक्षेत उत्तीर्ण झालेली अधिकारी *प्रतीक्षा पाटील* यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यासह विविध परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे; आणि याप्रसंगी यांचे व्याख्यान होणार आहे.
कार्यक्रमाच्या शुभप्रसंगी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. विक्रम एल. पाटील, सहसचिव डॉ. दीपक देसाई, खजिनदार नारायण खांडेकर, भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील, ज्योती करिअर अकॅडमीचे संचालक आणि समन्वयक प्रा. अमित सुब्रमण्यम, ज्योती पदवी पूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. शेलार, बीसीए महाविद्यालयाचे प्राचार्य आनंद पाटील, बीबीए महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बसवराज कोळुचे , तसेच दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी कर्मचारी आणि समाजातील नामवंत मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. या व्याख्यान आणि मार्गदर्शन शिबिरामध्ये सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा असे आवाहन द.म.शी मंडळ आणि ज्योती करिअर अकॅडमी चे डायरेक्टर कोऑर्डिनेटर प्रा. अमित सुब्रमण्यम यांनी केलेले आहे.