बेळगाव :
मराठी शाळेत शिक्षण घेतलेली व कन्नड भाषेत परीक्षा देत पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदावर निवड झालेल्या श्रुती पाटील यांचा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात किट्टूर कर्नाटक सेना व विविध दलित संघटनांचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. साध्या शैक्षणिक पार्श्वभूमीतून चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर मिळवलेले हे यश तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
श्रुती पाटील यांचा प्रवास तरुणाईसमोर आत्मविश्वास, ध्येयवेड आणि कष्टाचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला आहे.