**श्री विश्वकर्मा सेवा संघाचा वधू-वर मेळाव्याचे आयोजन**
**बेळगांव, १६ मार्च २०२५:** श्री विश्वकर्मा सेवा संघाच्या वतीने येणाऱ्या २१ मार्च २०२५, शुक्रवारी एक वधू-वर सूचक मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्याद्वारे विश्वकर्मा समाजातील अविवाहित तरुण-तरुणींच्या लग्नासाठी योग्य जोडीदार शोधण्याचा प्रयत्न केला जाईल. या उद्देशाने विश्वकर्मा समाजातील भगिनी-बंधूंनी आपल्या मुला-मुलींची नावे ४x६ आकाराचा फोटो आणि बायोडाटासहित श्री विश्वकर्मा सेवा संघामध्ये नोंदवावीत अशी विनंती संघाकडून करण्यात आली आहे.
याशिवाय, संघाकडून गोर-गरीब मुला-मुलींचे सामूहिक विवाहही करण्यात येणार आहेत. हे मंगल कार्य समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घराण्यांना मदत करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे.
**महत्त्वाचे तपशील:**
– **स्थळ:** श्री विश्वकर्मा सेवा संघ, बडोदा बँक जवळ, उद्यमबाग, बेळगांव.
– **वधू-वर मेळाव्याचे स्थळ:** सेलिब्रेशन हॉल, मेघडॉल कॅफे जवळ, उद्यमबाग, बेळगांव.
– **संपर्क क्रमांक:**
१) नामदेव लोहार – ९४४९६५०१२५
२) गीता लोहार – ९७४१०३३५२७
३) किरण सुतार – ९१४१९५३०९८
४) वैजनाथ लोहार – ७२५९७४८७८१
श्री विश्वकर्मा सेवा संघाच्या या पुढाकारातून समाजातील अविवाहित तरुण-तरुणींना योग्य जोडीदार शोधण्यास मदत होईल तसेच गरजूंना सामूहिक विवाहाद्वारे सामाजिक न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. अधिक माहितीसाठी संघाच्या प्रतिनिधींशी संपर्क साधावा.