बेळगावात श्री प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सवात उत्साहाचा जल्लोष
बेळगाव :
श्री विश्वकर्मा सेवा संघाच्या पुढाकाराने बेळगावात प्रभू विश्वकर्मा जयंती सोहळा अतिशय भव्य आणि दिमाखदार पद्धतीने साजरा करण्यात आला. समाजबांधवांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला अद्वितीय शोभा प्राप्त झाली.
वारकरी संप्रदायाच्या भक्तिगीतांनी वातावरण भारावून गेले तर टाळ-मृदंगाच्या गजरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीमुळे सोहळ्याला अध्यात्मिक आणि सांस्कृतिक तेज लाभले.
या प्रसंगी आमदार अभय पाटील, महापौर मंगेश पवार, नगरसेवक जयंत जाधव व नगरसेवक रमेश महिलागोळ यांची प्रमुख उपस्थिती राहिली. मान्यवरांच्या सहभागामुळे रथयात्रेला ऐतिहासिक व उत्साहपूर्ण रूप प्राप्त झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात श्री विश्वकर्मा सेवा संघ अध्यक्ष रमेश देसूरकर, उपाध्यक्ष नामदेव लोहार, सेक्रेटरी वैजनाथ लोहार, शिल्पी अध्यक्ष किरण सुतार यांच्यासह समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला कमिटीच्या अध्यक्षा गीता लोहार आणि सर्व महिला सदस्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
बेळगावात झालेला हा सोहळा समाजातील एकात्मता, श्रद्धा व सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवणारा ठरला.