बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात धुवाधार पाऊस झाल्यामुळे मलप्रभा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून हब्बनहट्टी येथील श्री स्वयंभू मारुती मंदिर पाण्याखाली गेले आहे.
खानापूर तालुक्यातील कणकुंबी आणि आमगाव येथे दरवर्षी सर्वाधिक पाऊस पडतो.कणकुंबी परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने त्या भागातील नदी,नाले आणि ओढ्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे.त्यामुळे अनेक गावात वीज पुरवठा खंडित झाला आहे.दमदार पावसामुळे भात रोप लावण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे. बेळगावहून गोव्याला जाणाऱ्या चोर्ला मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत आहे