श्री साई सन्मित्र सौहार्द सहकारी नियमित 9वा वार्षिक अहवाल खेळीमेळीत सादर करण्यात आला. हा कार्यक्रम नेहरूनगर येथे पार पडला. मागील वर्षी सोसायटीचा निव्वळ नफा हा रू.10,71,851/- चा झाला आहे. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर सौ रेश्माताई पाटील तसेच ज्योतिर्लिंग सोसायटीचे चेअरमन प्रभाकर पाटील व समाजसेवक प्रवीण पाटील हे उपस्थित होते.
प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून देवी लक्ष्मीच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सोसायटीच्या संचालिका सौ प्रमिला पाटील यांनी प्रास्ताविक करून प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सोसायटीचे चेअरमन व उद्योजक श्री विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला.
त्यानंतर सोसायटीचे संचालक श्री गजानन निलजकर यांनी संस्थेच्या मागे वर्षीचा नफा तोटा अहवालाचे वाचन करून दाखवले. नंतर सोसायटीच्या वतीने पाच शिक्षकांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला. वांगणेकर मॅडम, शितल दरवंदर, मंगल पाटील, मंगल चांदीलकर व पूजा पाटील अशा पाच शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.यावेळी सोसायटीच्या वतीने दरवर्षी वेगवेगळे स्पर्धेचे आयोजन करण्यात येते यावर्षी फुलांपासून रांगोळी बनवण्यासाठी स्पर्धा, विशेष करून महिला आणि बाल वर्ग त्यांच्यासाठी आयोजित करण्यात आली होती.
त्याचे बक्षीस वितरण देखील याचवेळी करण्यात आले.यावेळी उपमहापौर रेशमा पाटील यांनी सोसायटीच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच ज्योतिर्लिंग सोसायटीचे चेअरमन प्रभाकर पाटील यांनी सोसायटीच्या कामकाजाबद्दल कौतुक केले आणि त्याचबरोबर पारदर्शक कारभार आणि विश्वासाला पात्र यामुळेच सोसायटीला हे यश मिळाले.असाच पारदर्शी कारभार करत राहून सोसायटी सोबत सभासदांची प्रगती करावी असे मानोगत त्यांनी व्यक्त केले. समाजसेवक श्री प्रवीण पाटील यांनीही सोसायटीला शुभेच्छा दिल्या. यावेळेस चेअरमन श्री विश्वनाथ पाटील यांनी सांगितले की सोसायटीने समभाग धारकांना यावर्षी 14% नफा मिळवून दिला आहे. 2022-23 या काळात सोसायटीला रू.10,71,851/- इतका निव्वळ नफा झाला आहे. भविष्यात आपण यात आणखी वाढ करू असे प्रतिपादन यावेळी त्यांनी व्यक्त केले. यावेळेस सोसायटीचे व्हाईस चेअरमन शरद पाटील सर्व संचालक मंडळ युवराज पाटील, शिवाजी पाटील, मानसी पाटील स्नेहल पाटील, गजानन निलजकर, इराप्पा बळीगार, दिनेश शेट्टी, धर्माप्पा तळवार तसेच स्टाफ व समभाग धारक उपस्थित होते.