श्री अयोध्या महिला स्व सहाय संघाने साजरा केला महिला दिन
श्री आयोध्या महिला स्व सहाय्य संघाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सदर कार्यक्रम अयोध्या नगर येथे पार पडला.
यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय वीरशैव महासभा लिंगायतच्या जिल्हाध्यक्षा रत्ना बेल्लद्द, हिंदू जनजागृती समितीचे सदस्य उज्वला गावडे उपस्थित होत्या.
प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि गणपती सरस्वती आणि महालक्ष्मीच्या फोटो पूजनाने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आली.त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले . यावेळी त् सर्व महिलांना महिला दिनानिमित्त पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यामुळे प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना रत्ना बेल्लद यांनी महिलांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांना कशाप्रकारे आपला व्यवसाय वाढविला पाहिजे. याचे मार्गदर्शन केले.
यावेळी त्या म्हणाल्या की आता सर्वांना घरात कोणतेही पदार्थ करणे नको झाले आहे. त्यामुळे सर्वजण दुसऱ्यांकडून घरगुती पदार्थ बनवून घेत आहेत. त्यामुळे सर्व महिलांनी ज्यांना गरज आहे. त्यांना अशा प्रकाराचे खाद्य पदार्थ पुरवावेत आणि अर्थाजन करावे. तसेच आपल्या जर काही कामानिमित्त हे शक्य नसल्यास आपल्या आजूबाजूच्या महिलांना ते काम द्यावे आणि त्यांचेही अर्थाजन करावे आणि त्यांनाही पुढे येण्यास प्रोत्साहन द्यावे असे मार्गदर्शन करावे.
त्यानंतर उज्वला गावडे यांनी देखील महिलांना सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला मंडळाच्या उपाध्यक्ष वनश्री भातकांडे यांनी केले. यावेळी या महिला दिनाच्या कार्यक्रमाला श्री आयोध्या महिला स्व सहाय्य संघाच्या महिला मोठया संख्याने उपस्थित होत्या.