चव्हाट गल्लीत श्रावण सोमवारी पारंपरिक देवपूजांचा उत्सव
बेळगाव प्रतिनिधी :
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी बेळगावातील चव्हाट गल्ली धार्मिक आणि सांस्कृतिक उत्साहाने उजळून निघते. या परंपरेनुसार गल्लीतील सर्व प्रमुख देवतांची सामूहिक पूजा केली जाते. सुरुवातीला श्री चव्हाटा देवाचे पूजन करून विधीची सुरुवात होते.
या सोहळ्यात महिलावर्ग आपल्या-आपल्या देवीच्या (पडल्या) घेऊन उपस्थित राहतो. पारंपरिक पद्धतीने उतकार घालून पूजा केली जाते. एकूण पाच प्रमुख देवतांची पूजा करण्याची प्रथा येथे अनेक वर्षांपासून जोपासली जाते.
श्रावणातील शेवटच्या सोमवारी ही पूजा अधिक मोठ्या प्रमाणावर पार पडते. भक्तांच्या उपस्थितीत उत्साहाने देवतांची पूजा होऊन प्रसादाचे वाटप केले जाते. बेळगावातील चव्हाट गल्ली या अनोख्या परंपरेसाठी प्रसिद्ध असून, परिसरातील नागरिकांसाठी हा उत्सव आनंदाचा ठरतो.