कावळेवाडी वाचनालयचे कार्य कौतुकास्पद—-शिवाजी सुंठकर
कावळेवाडी(बेळगाव) आजच्याकाळात खेळाला अधिक महत्त्व आहे.युवापिढी विविधखेळाच्या यशातून गाव व देशाचे नाव उज्ज्वल करीतआहेत.कावळेवाडीतील वाचनालय गेली चारवर्षे सातत्याने विविध विधायक ,समाजाभिमुख कार्य करीतआहे मँरेथान स्पर्धेच्या निमित्ताने खेळाडूना उत्तेजन देण्याचे कार्य ही संस्था करीतआहे.हे कार्य कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी येथील मँरेथान स्पर्धेच्या उदघाटन प्रंसगी व्यक्त केले.
प्रारंभी शिवप्रतिमा व म.गांधी फोटो पूजन करण्यात आले.
पी.आर.गावडे यांनी उपस्थितांचे सन्मानचिन्ह,शाल,पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
अध्यक्ष वाय.पी.नाईक यांनी प्रास्ताविक करून खेळात ऐक्याची भावना वाढीसलागते,खेळ हा माणूस जोडतो.या छोट्याशा गावात शेकडो स्पर्धक आले हे भाग्य आहे दरवर्षी अशा स्पर्धा आयोजित करून प्रेरणा देण्याचे कार्य करू असे स्पष्ट केले
या स्पर्धा कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जि.प.मोहन मोरे उपस्थित होते.
व्यासपीठावर माजीआमदार संजयपाटील,रामचंद्र मनोळकर,शशिकांत मोरे,नागेद्र नायक,मोहन तरवाळ,वसंत अष्टेकर,बबनराव कांबळे,यशवंतराव मोरे,के.आर.भाष्कळ,पी.एस.भास्कर,अनंत पाटील,बाळासाहेब सपारे,पुंडलिक पावशे,एल.जी.कोलेकर,रेणू गावडे आदीमान्यवर उपस्थित होते
माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून व ध्वजफडकवून मानवंदना दिली.
चौदावर्षे गट–
प्रथम क्रमांक–प्रेम य. बुरूड(कावळेवाडी)
द्वितीय…ज्ञानदेव मो.शिंदे(शिंदोळी)तृतीय..वेदांत रा.होसूरकर(तोपिनकटी)चौथा..स्वयंम कर्लेकर(नावगे) अभिषेक हलकरणीकर(बिजगरणी)
महिला(खुलागट)–
1)–आकांक्षा गणेबैलकर(निटुर)2)-प्राची प्र.आवडण(हलकरणी)3)-स्नेहल सा.तोराळकर(बैलूर)4)-भारता ना. पाटील(बेळगाव)5)-प्राजक्ता मरगाळे)
पुरुष खुलागट—
१)-मोनूकुमार (खानापूर),२)-रोहितकुमार(खानापूर)३)प्रवीण धामणेकर(यळूर)४)-अनंत गावकर(खानापूर)५)-जगदीश शिंदे(खानापूर) ,उत्तेजनार्थ-सुरज भालेकर(मांजरी)
यासर्व तीनही गटातील विजेत्यांना रोखरक्कम ,मेडल व गौरवपत्र प्रदान करून सन्मानीत करण्यात आले.
यावेळी रेणू पा.गावडे यांचा विशेष सत्कार सन्मानचिन्ह,शाल,पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
माजीआमदार संजयपाटील यांनी खेळाडूना शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचालन सूरज का.मोरे,आभार मनोहर प. मोरे यांनी केले
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुरज कणबरकर,प्रुथ्वी जाधव, कांचन सावंत,रेखा मोरे,ज्ञानेश्वर जाधव,किरण यळूरकर,पी.एस.मोरे,दौलत कणबरकर,रवळू मोरे,नारायणप.मोरे,यलापा बुरूड,दत्ता मोरे,नागेश जाधव,प्रसाद जाधव,संतोष सुतार,अभिषेक सुतार,तेजस्वीनी कांबळे,आदीनी अधिक परिश्रमघेतले
तीनशे स्पर्धकानी सहभाग घेतलाहोता
अतिशय शिस्तबद्ध अशा वातावरणात उत्साहात स्पर्धा संपन्न झाल्या.उदंडप्रतिसादमिळाला