कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्साहात.
कॅम्प येथील कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री.शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून समिती नेते श्री.आर. एम.चौगुले,श्री.मदन बामने, श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष श्री.रमाकांत कोंडुस्कर,युवा समितीचे अध्यक्ष श्री.अंकुश केसरकर, सचिव श्रीकांत कदम यासह इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या स्वागत गीताने झाली.मुख्याध्यापक पी.एस. बिर्जे यांनी पुष्प व सन्मान चिन्ह देऊन पाहुण्यांचे स्वागत केले.यानंतर विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटावर आपले विचार मांडले.इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी गीताच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुणगान गायले.
त्यानंतर उपस्थित पाहुण्यांनी आपले विचार मांडताना रमाकांत कोंडुसकर यांनी मराठी भाषा व मराठी संस्कृती यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.समिती नेते आर. एम.चौगुले यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत शाळेविषयी समाधान व्यक्त केले, त्याचबरोबर श्री मदन बामने यांनी शाळेची स्वच्छता व शिस्त पाहून बेळगाव परिसरातील एक आदर्श मराठी शाळा म्हणून शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करून शाळेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी रांगोळीच्या माध्यमातून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते.पाहुण्यांनी या ठिकाणी भेट देऊन विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या प्रयोगाची माहिती जाणून घेतली त्याचबरोबर शाळेच्या वर्गामध्ये भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांची प्रगती पाहून समाधान व्यक्त केले.
शाळेच्या ऑडिटर मॅरीलीन कोरिया यांनी सुद्धा शाळेच्या विज्ञान प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांकडून या प्रदर्शनाची माहिती जाणून घेतली व सहभागी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेची विद्यार्थिनी आज्ञा जुवेकर तर आभार शिक्षक उदय पाटील यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक धनाजी कुरणे,नीता गुंजीकर, श्रीकांत काटकर,मनीषा वड्डगोळ,तुषार कांबळे,राहुल कांबळे,रेणुका बागडी, संगीत शिक्षिका रेणुका सरमळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.