संत मीरा इंग्रजी शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी.
बेळगांव ता अनगोळ येथील जन कल्याण ट्रस्ट संचलित संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रचारक हिरामणी मुचंडीकर, शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव ,आशा कुलकर्णी, गीता वर्पे, वीणाश्री तुक्कार, सविता पाटणकर, चंद्रकांत पाटील, शिवकुमार सुतार, चंद्रकांत तुर्केवाडी उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्यांचे हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज फोटो पूजन, ओंकार, सरस्वती, भारतमाता फोटो पूजन व दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले
हिंदवी शिंदे हिने प्रास्ताविक केल्यानंतर शालेय मुलींनी पाळणा गायला. निरीक्षा कांदेकर ,भावना बेर्डे व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रचारक हिरामणी मुचंडीकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले समर्थ येळ्ळूकर निरंज घाडी यांनी महाराजांची आरती गायली ,समर्थ पनारे ,रोहन कुगजी आर्यन कलखांबकर यांनी प्रेरणा मंत्र म्हटले, तर सोहम डुकरे यांनी घोषणा दिली, तर अनिरुद्ध हलगेकर विचार घोषणा केली, तर सोहम डुकरेने महाराजांबद्दल प्रतिज्ञा दिली, तर सोनाक्षी देसाई व तिच्या सहकार्याने महाराजांचा पोवाडा गायिला समर्थ येळ्ळूरकर व निरज घाडी यांनी ध्येयमंत्र सादर केले.https://dmedia24.com/celebrate-the-8th-anniversary-of-the-konwal-street-rich-ganesh-temple/
शेवटी सायली लोहार हिने आभार मानले, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षिका तेजस्विनी, रूपा कुमठाकर, धनश्री सावंत, निला धाकलुचे, गायत्री शेंद्रे, चंद्रकला, बसवंत पाटील, लक्ष्मी पेडणेकर, भारती बाळेकुंद्री, सुनिता पाटील, सुजाता होळकर, अश्विनी लोहार, यांनी विशेष परिश्रम घेतले.
https://www.facebook.com/share/v/15vWDQZNfk/