शिवछत्रपती हे अखंड हिंदुस्तानाचे दैवत डॉ. संदीप महेंद्रजी गुरुजी.
शिवभक्तनी घेतले शिवछत्रपतींच्या पादुकांचे दर्शन. यावेळी डॉ. महेंद्रजी म्हणाले की शिवछत्रपती हे मोबाईल, फेसबुक, व्हाट्सअप, यांच्या माध्यमातून कळत नाहीत तर त्यांना समजावून घ्यायचा असेल तर आजच्या तरुणांनी गडकिल्ल, ग्रंथ, यांच्या सहवासात राहिले पाहिजे प. पू.प्राणलिंग महास्वामीजी हे देव देश धर्माचे कार्य करण्यासाठी निपाणी परिसरातील निस्वार्थ तरुणांची फळी निर्माण करत आहेत हे कार्य लाख मोलाचे आहे या कार्यात जिल्ह्यातील तरुणांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला पाहिजे असे असे जमलेले शिवभक्तांना डॉ. महिंद्र गुरुजी यांनी संबोधित केले.
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचे पादुकांचे आगमन शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक निपाणी येथे झाले यावेळी शिवाजी महाराजांच्या मूर्तीस डॉ. संदीप महेंद्रजी यांनी हार अर्पण केला त्यानंतर श्रीदत्तपीठ तमनाकवाडा येथील प.पू सद्गुरु सचिदानंद बाबा यांच्या हस्ते श्रींच्या पादुकांचे पूजन करण्यात आले त्यानंतर नगरसेविका सौ. राणी शेलार यांच्या हस्ते पालखी साठी आलेल्या दिंडीचे पूजन करण्यात आले, चंद्रकांत तारळे यांच्या हस्ते मर्दानी खेळामधील शस्त्रांचे पूजन करण्यात आले, यानंतर पालखी सोहळ्याची सुरुवात समाधी मठाचे प. पू प्राणलिंग स्वामीजी यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले,
यावेळी हा पालखी सोहळा छत्रपती शिवाजी महाराज चौक, नरवीर तानाजी चौक, कोठेवाली कॉर्नर, कित्तूर राणी चन्नमा सर्कल, साखरवाडी मार्गे धर्मवीर संभाजी राजे चौक (बस स्टँड) येथे या पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली यावेळी इस्कॉन भजनी मंडळ यांच्या वतीने हरिनामाचा गजर करण्यात आला तसेच कोठेवाली कॉर्नर येथील ट्रबल्स ग्रुप यांच्यावतीने आतिषबाजी व पुष्प वर्षाव करून टाऊन पोलीस स्टेशनच्या पीएसआय मॅडम यांच्या वतीने महाराजांच्या मूर्तीचे मूर्तीचे पूजन करून फिरंगोजी शिंदे सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संचलित मर्दानी आखाडा सैनिक गिरगाव कोल्हापूर यांची मर्दानी खेळाची प्रात्यक्षिक चौका चौकात दाखवण्यात आले.
तसेच वारकरी संप्रदाय सौंदलगा, शिरगुप्पी, श्रीपेवाडी, कोडणी, भिवशी, बुदलमुख, पांगीर, बुदिहाल, अर्जुनी, रामपूर, चिखलवाळ, यमगरणी, गायकवाड, तवंदी, जत्राट, पडलिहाल, लखमापूर, शेंदूर, रांशिंग,अर्जूनी, निपाणी येथून मोठया संख्येने महीला व पुरुष भजनी मंडळ या पालखी सोहळ्यात सहभाग घेतला होता या पालखी सोहळ्याचे स्वागत चौका चौकात आतिशबाजी व पुष्प वर्षाव करून उत्तमआण्णा युवा मंच यांचा वतीने करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा नेते उत्तम आण्णा पाटील, मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज तरूण मंडळ, विश्व हिंदू परिषद, मावळा ग्रुप, एक दिवशी गडकोट मोहिम, ट्रबल्स ग्रुप, शिवराष्ट्र संघटना यांनी हा पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले.