शामनूर शिवशंकरप्पा यांनी माफी मागावी
वीरशैव लिंगायत महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष शामनूर शिवशंकरप्पा यांनी जागतिक लिंगायत महासभा आणि प्रधान मुख्य सचिव डॉ. शिवानंद जामदार यांच्याविषयी नुकतेच अवमानकारक वक्तव्य केले आहे. ‘त्या’ विधानाबद्दल त्यांनी विनाशर्त माफी मागावी अशी मागणी जागतिक लिंगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष बसवराज रोट्टी यांनी केली.
शहरात आज पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली.त्यानी केलेले वक्त्यव्य राज्यातील अनेक प्रमुख वृत्तपत्रात, प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाले आहे. त्यांचे हे वक्तव्य निषेधार्ह आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागावी .
जागतिक लिंगायत महासभा कुठे आहे? तिथे फक्त मुख्य सचिव डॉक्टर शिवानंद जामदार आहेत. त्यांना वेड्यांच्या इस्पितळात दाखल करण्याची गरज आहे.
कोण नेलं नाही तर आम्हीच त्यांना वेड्यांच्या इस्पितळात दाखल करू असे वक्तव्य शामनूर शिवशंकरप्पा यांनी केले आहे. त्याबद्दल त्यांनी विनाशर्त माफी मागावी आणि वक्तव्य मागे घ्यावे अशी मागणी रोट्टी यांनी केली .यावेळी पत्रकार परिषदेला लिंगायत महासभेचे पदाधिकारी उपस्थित होते.