शहा यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा
बेळगांव: गृहमंत्री अमित शहा राजीनामा द्यावा. ही मागणी करत दलित संघर्ष समिती आंबेडकरवाद यांच्यावतीने गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रतिकृतीची अंत्ययात्रा काढत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.
दलित संघर्ष समिती आंबेडकर वादचे राज्यअध्यक्ष मावळी शंकर, राज्य संघटना संघटक सिद्धाप्पा कांबळे, बेळगाव जिल्हाध्यक्ष महांतेश तळवार, यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले. आंबेडकर उद्यानेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर चन्नम्मा सर्कल येथे अमित शहा यांच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला आहे.
गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला आहे व संपूर्ण दलित समाजाचा अपमान केला आहे. यासाठी अमित शहा यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची मागणी यावेळी सिद्धाप्पा कांबळे यांनी केली.
या आंदोलनाला महादेव तळवार,मारुती कांबळे, कामशेट्टी, अशोक कांबळे, संतोष कांबळे, रामा चव्हाण, नींगाप्पा कांबळे, दीपक धबाडे, जीवन कुरणे,सागर कोलकर, यांच्यासहित मोठ्या संख्येने दलित बांधूव उपस्थित होते.