१० ₹ अमिष दाखवुन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
बेळगांव: १० रुपये पैशांचे अमिष दाखवून १० वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना निपाणी शहरात उघडकीस आली असून काल दिनांक २१/०८/२०२४ रोजी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
कलकत्ता व बेंगलोर येथील घटनेला एक महिनाही उलटला नाही आणि बेळगावच्या सीमेवरती असलेल्या निपाणी शहरांमध्ये एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
निपाणी शहरामध्ये १० वर्षीय मुलीचा आसिफ बागवान याने १० रुपयांचे आमिष दाखवून लैंगिक छळ केला. ही घटना निपाणीतील बादल प्लॉटमध्ये घडली असून त्याने मुलीच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केल्याचे मुलीने व पालकांकडून सांगण्यात आले आहे.
त्यानंतर रविवारी १८ ऑगस्ट रोजी आसिफला त्याच्या आई-वडिलांनी बेदम मारहाण केली.बुधवारी उशिरा उघडकीस आलेल्या या घटनेबाबत २१ रोजी निपाणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.