आत्महत्या करून सात वर्षांचे वैवाहिक जीवन संपवले
सबा मुजावरने आत्महत्या करून सात वर्षांचे वैवाहिक जीवन संपवले.खानापूर तालुक्यातील गुंडुपी गावातील सबा मुजावर यांनी काल राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबत तिची आई बसेरा साहेबखाना यांनी नंदगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.आपल्या मुलीच्या पती दिलाशाद मुजावर यांच्यात सतत भांडण होत होती .
तुला नीट स्वयंपाक येत नाही, तुझे वागणे व बोलणे चांगले नाही, तू घराबाहेर पडू नकोस, विनाकारण घरातील घाणेरडे शब्द बोलून त्रास देत होते.
त्यामुळे त्याच्या जाचाला कंटाळून तिने आपले जीवन संपविले .नंदगड पोलिसांनी पती मुजाहिद्दीन मुजावर व सासरा शेबीर मुजावर यांना अटक केली असून अतेदिलाशाद मुजावर यांची चौकशी व तपास करत आहेत.
सबाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बेळगाव येथील बीआयएमएस येथे पाठविण्यात येणार असून शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.