कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळेत सर्पविषयक मार्गदर्शन.
नागपंचमीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमधील सर्पविषयीचे अज्ञान व भीती दूर व्हावी या उद्देशाने सर्पमित्र श्री आनंद चिट्टी याचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत अशावेळी सापांचे बाहेर येण्याचे प्रमाण देखील वाढत जाते. त्यामुळे योग्य काळजी घेऊन सापांच्यापासून आपले संरक्षण कसे करावे व सापांच्या रक्षणासाठी आपण काय करावे या महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले.
यामध्ये
● सापांचे वेगवेगळे प्रकार कोणते? विषारी साप व बिनविषारी साप कसे ओळखायचे?
● सर्पदंश झाल्यावर प्राथमिक उपचार कोणते करावेत? कोणत्या दवाखान्यात जावे? लस कुठे उपलब्ध असते?
● सापांच्या अधिवासाची ठिकाणे कोणती? साप दिसल्यावर नक्की काय करावे? साप पकडण्यासाठी कोणाला सांगावे?
● सापांचे जैवविविधतेमधील महत्वाचे स्थान, त्यांची अन्नसाखळी व साप मारल्यामुळे होणारे नुकसान व साप मारल्यावर दाखल होणारे गुन्हे.
याबाबतीत मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पी.एस.बिर्जे,सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.