बेळगाव डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कराटे
असोसिएशनच्या वतीने निवड चाचणी
बेळगाव:
येथील बेळगाव डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कराटे असोसिएशन यांच्या वतीने बुधवारी गंगाधर शानबाग हॉल येथे ज्युनिअर , सब ज्युनिअर , कॅडेट, 21 वर्षावरील आणि 21 वर्षांखालील कराटेपटू स्पर्धकांसाठी निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.https://dmedia24.com/suicide-of-the-bus-driver-on-the-bus/
बेळगाव जिल्ह्यातील खानापूर , अथणी , गोकाक, बेळगाव या तालुक्यातील सुमारे 185 स्पर्धकांनी या निवड स्पर्धेत भाग घेतला होता. यावेळी स्पर्धेला पंच म्हणून प्रभाकर किल्लेकर, परशुराम काकती, अक्षय परमोजी, हरीश सोनार , नताशा अष्टेकर, विठ्ठल बोजगार , संजू गस्ती, अमित वेसणे , चंदन जोशी यांनी काम पाहिले. या निवड चाचणी स्पर्धेमध्ये निवड झालेल्या स्पर्धकांची 11 आणि 12 एप्रिल रोजी हुबळी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे.
यावेळी व्यासपीठावर बेळगाव डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर, सेक्रेटरी जितेंद्र काकतीकर , उपाध्यक्ष रमेश अलगुंडीकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते श्रीगणेशमूर्तीचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी कराटेपट्टू , प्रशिक्षक , पालक वर्ग आदी मान्यवर उपस्थित होते. बेळगाव डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कराटे असोसिएशन यांच्या वतीने दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेच्या आयोजनामागे खेळाडूंना तयार करून त्यांना राष्ट्रीय पातळीपर्यंत पाठवणे हा स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे संयोजकांनी यावेळी सांगितले.