ज्ञानमंदिर शाळेच्या पार्थ चतुरची राज्य स्पर्धेसाठी निवड.
बेळगाव तारीख 28. शास्त्रीनगर येथील ज्ञान मंदिर शाळेच्या पार्थ महेश चतुर याची राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
नुकत्याच सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने घेण्यात आलेला जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत ज्ञानमंदिर शाळेच्या पार्थ महेश चतुर याने 48 ते 50 वजनी किलो गटात सुवर्णपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्याला प्रशिक्षक अर्जुन पुरस्कार विजेते मुकुंद किल्लेकर, ज्ञान मंदिर शाळेचे क्रीडाशिक्षक बापूसाहेब देसाई, शाळेच्या संचालिका भक्ती देसाई, मुख्याध्यापिका अलका जाधव, यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभत आहे.