बेळगावच्या विकलांग बॅटमट्टूंची चॅम्पियनशिप स्पर्धेत निवड
आळवण गल्ली शहापूर येथे द असोसिएशन ऑफ द फिजिकल हॅंडीकॅप संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या कार्यक्रमात इंदोर येथे झालेल्या बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत बेळगावच्या विकलांग बॅटमट्टूंची निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजप राज्य ओबीसी युवा मोर्चाचे सचिव आणि सकल मराठा चे नेते किरण जाधव उपस्थित होते यावेळी त्यांनी विकलांग विद्यार्थ्यांनी जी त्यांनी आताच परिश्रमाच्या बळावर जीवनात प्रगती साधावी आणि आपल्या पालकांचे ऋण फेडावे असे मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रम हा एचपी स्पोर्ट्स क्लब या क्रीडा भवनात आयोजित करण्यात आला होता यावेळी विकलांग टेबल टेनिस क्रिकेटपटूंसाठी सुरू करण्यात आलेल्या टेबल टेनिस कोर्सचे उद्घाटन प्रमुख पाहुणे किरण जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी इंदोर बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत निवड झालेल्या बॅटमिंटन पट्टूंना शुभेच्छा दिल्या .
यावेळी ते म्हणाले की विकलांग विद्यार्थी कोणत्याही गोष्टीचा बाऊ न करता आज पुढे आले आहेत त्यांनी सर्व त्या समस्येला तोंड देऊन अनेक अडचणींवर मात केली आहे आणि यशाचे शिखर गाठले आहे.
त्यांच्यामध्ये असलेली जिद्द आता आपण अंगीकारली पाहिजे तसेच आता परिश्रम करून स्वबळावर जीवनात प्रगती केली पाहिजे असे मनोगत व्यक्त केले यावेळी या कार्यक्रमाला राघवेंद्र संतोष जोशी सवाशेरी कट्टीमनी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.