*आस्था चिंतन शाह या विद्यार्थिनीची राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड*
नुकत्याच पार पडलेल्या दि: 19 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या दरम्यान सी बी एस ई साउथ झोन तायक्वांदो स्पर्धा आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल कोपरगाव शिर्डी येथे पार पडल्या या स्पर्धेमध्ये निपाणी येथून के एल इ सी बी एस ई शाळेची विद्यार्थिनी कुमारी आस्था चिंतन शहा 14 वर्ष आतील गटात 22 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले.
तर 17 वर्षे आतील गटात 38 किलो वजन गटात सोनल संतोष लिगाडे या विद्यार्थिनीने कांस्यपदक पटकाविले.
तर सौम्या खोत, आराध्या होनवाडे, समर्थ पाटील, प्रेम पुजारी ,विधान श्रीपन्नावर, या विद्यार्थ्यांनी अंतिम फेरीपर्यंत लढतील दिली.
9 ऑक्टोंबर ते 13 ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या झारखंड येथे राष्ट्रीय स्पर्धेसाठी आस्था शाह या विद्यार्थिनीची निवड झाली. या स्पर्धेमध्ये साउथ झोन मधून एकूण 850 मुला मुलींनी सहभाग घेतला होता. यशस्वी विद्यार्थिनीला महाराष्ट्र ओलंपिक असोसिएशनचे सेक्रेटरी श्री नामदेव शिरगावकर यांच्या हस्ते गौरवचिन्ह देऊन गौरविण्यात आले यशस्वी विद्यार्थिनीला शाळेच्या प्रिन्सिपल आशा मार्टिन तायक्वांदो प्रशिक्षक बबन निर्मले शाळेचे क्रीडा शिक्षक विलास जगजम्पी यांचे मार्गदर्शन लाभत आहे यशस्वी विद्यार्थिनीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.