*जायंटसचे दहावी पूर्वपरीक्षा मार्गदर्शन*बेळगांव: ॲपटेक एव्हिएशन अकॅडमीमध्ये प्रशिक्षण पूर्ण करून इन्कम हॉस्पिटॅलटी इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट दिल्लीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे अकॅडमीच्या सभागृहामध्ये आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे ॲपटेक एव्हिएशनची व्यावसायिक भागीदार विनोद बामणे, सरस्वती इन्फोटेकच्या ज्योती बामणे,ॲपटेक एव्हिएशन बेळगाव शाखेचे व्यवस्थापक फैजल सर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात रोपट्याला पाणी देऊन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की अकॅडमी मध्ये येण्याआधी आपण कसे होतो आणि प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आपण कसे तयार झालो.आत्मविश्वास असा निर्माण झाला व उत्तम प्रकारे आपण आता इंग्लिश बोलत असल्याचे त्यांनी सांगितले.याची सर्व श्रेय विनोद बामणे व अकॅडमी येथील शिक्षकांना जाते असे त्यांनी सांगितले.
इन्कम हॉस्पिटॅलटी इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट दिल्लीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुष्पा लाट्टी , विक्रम हळदणकर -शिनोळी , दीक्षा शिंदे – शिवाजी नगर बेळगांव, सदना शहाणा – हासन, कृपा शिंदे – अंजण्य नगर बेळगांव तर बेंगळूर एअरपोर्ट साठी विनायक तुगशेट्टी,अस्कर अम्मन, रोहित बडवी यांची निवड झाली.