*राज्यस्तरीय तांत्रिक स्पर्धेत पटकाविले द्वितीय पारितोषिक*
बेळगांव: येथील मराठा मंडळ पॉलिटेक्निक मधील अंतिम वर्षाच्या इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स शाखेचे विद्यार्थी श्रेयस पवार व मल्लिकार्जुन एन. यांनी निदासोशी येथील हायर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (HIT) मध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय तांत्रिक स्पर्धेत द्वितीय पारितोषिक मिळवून संस्थेचा गौरव वाढविला.कर्नाटकातील सर्व पॉलिटेक्निक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीच्या या स्पर्धेत त्यांनी तांत्रिक कौशल्य आणि नाविन्यपूर्ण विचारसरणीने सर्वांचे लक्ष वेधले.
या यशामागील विद्यार्थ्यांचे परिश्रम व मार्गदर्शन मराठा मंडळ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे अध्यक्ष डॉ. राजश्री नागराजू (हलगेकर), प्राचार्य आर.एस. सूर्यवंशी, शिक्षक शिक्षिका,कर्मचारी यांचे लाभले.डॉ. हलगेकर यांनी म्हटले, *”विद्यार्थ्यांचे हे यश संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण धोरणाचे प्रतिबिंब आहे. त्यांनी आमच्या विश्वासावर पूर्ण उतरून दाखविलं आहे.”
प्राचार्य सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत म्हटलं, “स्पर्धेच्या अवघड पातळीवर असं यश मिळवणं हे त्यांच्या अखंड परिश्रमाचं फलित आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या भविष्यातील यशासाठी शुभेच्छुक आहोत.”https://dmedia24.com/the-suspect-arrested-in-connection-with-the-suicide-of-a-student/
या निकालाने संस्थेतील शिक्षक-कर्मचाऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रतिभेचा परिपोष करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न केल्याचेही यावेळी गांभीर्याने नमूद करण्यात आले. शेवटी, संस्थेने स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना आभार मानले आणि भविष्यात अशाच यशस्वी घटनांची अपेक्षा व्यक्त केली.