This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

January 2025
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

टिप्पर चालकाच्या चुकीमुळे शाळकरी मुलाचा मृत्यू

टिप्पर चालकाच्या चुकीमुळे शाळकरी मुलाचा मृत्यू
D Media 24

टिप्पर चालकाच्या चुकीमुळे शाळकरी मुलाचा मृत्यू

बेळगांव : येथील अनगोळ वडगाव रोड कॉर्नर येथे अमोल बेकरी समोर टिप्पर चालकाने शाळकरी मुलाला चिरडण्याची घटना आज सायंकाळी घडली व टिप्पर चालकाने आपले वाहन तिथेच सोडून पलायन केले.मृत मुलाचे नाव कु. प्रविण महादेव शिंदे,राहाणार 4 थे रेल्वे गेट, संत रोहिदास नगर,अनगोळ.आहे.सदर घटनेत प्रशासनाचा गलथानपणा नजरेत येतो अनगोळ- वडगाव रोड ते अनगोळ मरगाई मंदिर येथे कमीत कमी 4 ते 5 शाळा असून या शाळांच्या जवळील मार्गावरून नेहमी टिप्पर चालक टिप्पर घेऊन ये जा करतात त्यांच्या गतीलाही सुमार नसतो वेळोवेळी पालक वर्गातून व नागरिकांतून प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा या टिप्पर वाहतुकीला आळा बसलेला नाहीये सर्रासपणे त्यांची एजा सुरूच आहे. आज प्रशासनाच्या गलथानपणामुळे व टिप्पर चालकांच्या बेफिक्रीमुळे एका निष्पाप मुलाचा बळी गेला आहे.
या टिप्पर चालका विरुद्ध लवकरात लवकर कारवाई व्हावी व या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद व्हावी अशी पालक वर्गातून व नागरिकांतून मागणी होत आहे अन्यथा पालक वर्ग रस्त्यावर येऊन प्रशासनाला जाब विचारतील असा इशारा देण्यात येत आहे.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply