बेळगाव परिसरातील नागरिकांसाठी SBG हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सेवेचे दालन सुसज्ज
बेळगाव :गणेशपूर रोड, लक्ष्मी टेक येथील एसबीजी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल यांच्या माध्यमातून गरजूंसाठी सर्व प्रकारची अत्याधुनिक वैद्यकीय सेवा योग्य दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. कॉलेजचे प्राचार्य आणि हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. अडीवेश अरकेरी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, या हॉस्पिटलच्या माध्यमातून बेळगाव परिसरातील नागरिकांसाठी वैद्यकीय सेवेचे दालन सुसज्ज करण्यात आले आहे. वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असणाऱ्या सर्व चाचण्या, उपचार तसेच शस्त्रक्रिया यांची सुविधा या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. त्यासाठी तज्ञ डॉक्टरांचा कर्मचारी वृंद देखील सज्ज करण्यात आलेला आहे.
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अल्प दरात सुविधा
देण्याकरिता स्वतंत्र कक्ष देखील निर्माण करण्यात आले आहेत. गरजूंना आवश्यक असणाऱ्या रोगनिदानाच्या बरोबरीने त्यांच्यावरील शस्त्रक्रियांसाठी अत्याधुनिक उपकरणे सज्ज आहेत. आयुर्वे दामधील सर्व सेवांच्या बरोबरीने शस्त्रक्रियांच्या गरजेची पूर्तता तत्परतेने करण्यासाठी हॉस्पिटल कार्यरत आहे. असे यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेच्या वेळी डॉ. अनिल कुरंगी, डॉ. विनिता, अमोल जैन आणि इतर सदस्य उपस्थित होते.