येथे सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी
सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची जयंती शहरात उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी भारतीय बौद्ध महासभेने भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली प्रारंभी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाला कशाप्रकारे महत्व दिले याबद्दल माहिती देण्यात आली यावेळी या कार्यक्रमात प्रा के डी मंत्रेशी यांनी भारतात महिलांचे अधिकार सुधारणात महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी दिलेल्या शिक्षण क्षेत्रातील मुलाच्या योगदानाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच त्यांनी स्वातंत्र्य बाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी का म्हटले जाते आणि सावित्रीबाई फुले यांना पहिल्या महिला शिक्षिका म्हणून का संबोधले जाते याबद्दल सविस्तर सांगून त्यांचे पती ज्योतिबा फुले यांच्या बद्दल ही सर्वांना माहिती दिली.
यावेळी वाय डी गडी नायक दीपक शिरोटे कृष्णा कांबळे महांतेश तलवार जीवन कुरणे श्रीनिवास तलवार यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे सदस्य उपस्थित होते.