बेळगाव रोलर स्केटिंग अकादमी, प्यास फाऊंडेशन आणि जायनटस ग्रुप ऑफ बेळगाव परिवाराच्या वतीने आयोजित पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली रविवरी 21 एप्रिल 2024 रोजी गोवावेस स्विमिंग पूल स्केटिंग रिंक ते साई बाबा मंदिर टिळकवाडी बेळगाव पर्यंत सुमारे 200 च्या वर . या रॅलीत 4-16 वर्षांच्या वयोगटातील स्केटरनी सहभाग घेतला होता.
एकूण 2 किमी अंतर कव्हरिंग करत “पाणी वाचवा जीवन वाचवा” “जल हे तो कल हे” ही जनजागृती करणारी ही रॅली लोकांमध्ये संदेश देत होती या रॅलीला डॉ. माधव प्रभू अध्यक्ष प्यास फाऊंडेशन, बेळगाव सिटी कॉर्पोरेशन चे नगरसेवक श्री नितीन जाधव, श्री राजू माळवदे फेडरेशनचे सदस्य यांचे हस्थे सुरवात करनात आली यावेली श्री. विजयकुमार खोत अध्यक्ष जायटस ग्रुप ऑफ बेळगाव परिवार,प्रवीण त्रिवेदी ,श्री राम घोरपडे, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी,विठ्ठल गगणे, विशाल वेसणे,तुकाराम पाटील, जौफ माडीवाले सक्षम जाधव, सागर चोगुले, बेळगाव रोलर अकादमीचे स्केटर आनी पालक वर्ग मोटया प्रमानात उपस्थीत होते.